अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

५० वर्षीय रुग्णाचा भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू


अंबरनाथ : अंबरनाथमधील पहिल्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचारादरम्यान या ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी दिली आहे. अंबरनाथलाही कोरोना रुग्णाचा बळीची पहिली घटना घडल्याने अंबरनाथ हादरले आहे .
अंबरनाथमधील हा ५० वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी खाजगी कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेश येथे आपल्या गावी गेले होते. त्यानंतर त्यांना मधुमेह व हृदयविकार आदींचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी अंबरनाथमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे केलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना मुंबईतील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला मुंबईला हलवण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची देखील तपासणी करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
बुवा पाडा येथे आढळून आलेला कोरोना रुग्ण १० मार्च रोजी उत्तरप्रदेशला गेला होता. तेथून तो १८ मार्च रोजी पुन्हा अंबरनाथला आला होता. त्याला मधुमेहाचा त्रास असल्याने त्याची तब्येत बिघडली होती. यासाठी त्याने अंबरनाथमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. तरीही त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने मुंबईला केईएम रुग्णालयामध्ये मध्ये उपचारासाठी दाखल केले. केईएम मध्ये उपचारादरम्यान या रुग्णाची कोरोना तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पोझोटीव्ह आल्याने नंतर त्याला भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तथापि संबंधित रुग्णाचा मृत्यू अहवाल प्राप्त झाला नाही, अहवालानंतरच कोरोनामुळे मृत्यू झाला की अन्य विकारामुळे झाला याचा उलगडा होईल.
अंबरनाथला बुवा पाडामध्ये राहणाऱ्या रुग्णावर २६ मार्चपासून भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते, कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबियांची कोरोना तपासणी केली तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तो रहात असलेला परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनीही आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडून नये असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे.

 380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.