स्पर्धा टाळून निधी दिला कोरोनविरुद्धच्या लढाईसाठी

मावळी मंडळातर्फे मुख्यमंत्री निधीसाठी १० लाख रुपयांची मदत

ठाणे : श्री मावळी मंडळ ही ठाण्यातील ९५ वर्षे क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था. श्री मावळी मंडळ संस्था गेली ७० वर्षे शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. परंतु या वर्षी आपल्या देशावर आलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. संस्थेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा जमा निधी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व स्थलांतरित गरीब कामगार वर्गासाठी मुख्यमंत्री फंडांमध्ये १० लाख रुपयांचा धनादेश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ह्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे विश्वस्त जोसेफ फर्नांडीस , उपाध्यक्ष सुधाकर मोरे, अध्यक्ष कृष्णा डोंगरे उपस्थित होते.

 777 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.