दुसऱ्या टप्प्यातही रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद

७५ बाटल्या रक्त जमा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ७५ बाटल्या रक्त जमा करण्यात आले आहे. ८ रक्तदात्यांना इच्छा असूनही रक्त देता आले नाही. वैद्यकीय कारणामुळे त्यांना परत फिरावे लागले. या ८ मध्ये ५ महिला रक्तदात्या होत्या.
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या महामारीला सर्व पातळीवर तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असताना त्यांना सामाजिक शैक्षणिक संघटनाही सक्रिय सहकार्य करीत आहेत. या महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत आणि बुधवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत रोटरी सभागृह, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रविवारी ७६ बाटल्या तर आज ७५ बाटल्या रक्त जमा करण्यात आले.
विशेष म्हणजे सुरक्षेचा उपाय म्हणून रक्तदान करणार्यांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. आयत्यावेळी येणार्यांना रक्तदान करता येणार नाही. रक्तदात्यांना रक्तदान केंद्रावर ठरवून दिलेल्या वेळी घरून घेऊन येणे आणि रक्तदान झाल्यावर पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला. या शिबिराला डोंबिवली येथील चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट रक्तपेढीचे सहकार्य लाभले होते. दुपारी ३ पर्यंत ची वेळ देण्यात आली होती. मात्र प्रतिसाद चांगला मिळाल्याने चार वाजेपर्यंत शिबिर सुरू होते. एकूण ७५ बाटल्या रक्त जमा करण्यात आले. या मध्ये पाच महिलांनी रक्तदान केले आहे. ८ रक्त दात्याना इच्छा असूनही रक्त देता आले नाही. या ८ पैकी ५ महिला रकतदात्या होत्या. ज्यांना इच्छा असूनही रक्त देता आले नाही.

 611 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.