कोरोनाच्या छायेत २५४ नवीन वाहनाची नोंदणी


गुढीपाडव्याला ठाणे आरटीओमध्ये सर्वाधिक  दुचाकींची नोंदणी

ठाणे :  कोरोनाच्या भीतीमुळे आज सर्वांनी आपल्या हौशेमौजेला लगाम घातला असला तरी  शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा तसाच आहे. साडेतीन मुहूर्तामध्ये येणा-या गुढीपाडव्याला नवीन वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात  झाली पाहिजे, असा अट्टहास अनेकांचा असतो.ठाणे प्रादेशिक कार्यालयात गुढीपाडव्याच्या दिवशी तब्बल दुचाकी, मोटरकर मालचहतुक आशा मििळून २५४ नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून १४ एप्रिल पर्यत देशात कर्फ्यु ऑर्डर देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन सर्वांना केंद्र आणि राज्यसरकारने केले आहे. बहुतांशी नागरिकांनी याची अमलबजावणी केल्याचे चित्र ठाण्यात दिसतं. परंतु या दिवसात येणाऱ्या सणोत्सवाची खरेदीची आखणी अगोदरच केली आहे. गुडुपडव्याच्या दिवशी याचा प्रत्यय दिसून आला. कोरोनामुळे नवीन वस्तू खरेदीसाठी दुकान उघडतील की नाही याची भीती सर्वानाच होती. त्यामुळे ठाणेकरांनी अगोदरच नवीन  वस्तू खरेदी केलय. की जेणे करून गुढीपाडवयच्या मुहूर्तावर त्या वापरात याव्यात. नवीन गाड्यांच्या बाबतीत ठाणेकरांनी अगोदरच सजगता दाखवली आहे. शोरूम मध्ये अगोदरच वाहनांची खरेदी केली . परंतु   गुढीपाडव्याला गाडीच रजिस्ट्रेशन .होईल यादृष्टीने विचार केला होता. सर्वाधीक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली.

अगोदरच वाहन खरेदी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने खबरदारी घेतली आहे. परंतु नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन वाहनांची नोंदणी केली जाते. यंदा कोरोनाच सावट नवीन वाहन खरेदीवर झालं असलं तरी  गुढीपाडव्याच्या अनुषंगाने ठाणेकरांनी अगोदरच नवीन वाहन खरेदी केली आहेत. त्यानुसार दुचाकी १९९ मालवाहतूक  ३० तर २५ मोटरकार मिळून २५४ वाहनांची नोंद झाली 
  नंदकिशोर नाईक (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे) 

शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी
डिझेल  आणि पेट्रोलचे दर कमी अथवा वाढले तरी नवीन वाहन खरेदी करणा-यांची संख्या वाढते आहे. परंतु  कोरोना व्हायरसचा परिणाम वाहनांच्या शोरूमवर झाला आहे. नवीन वाहन खरेदी करण्याची संख्या खालावली आहे.गुढीपाडव्याला नवीन गाडीचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. यासाठी काहींनी अगोदरच गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकीची समावेश आहे.

 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.