रक्तदान शिबिराचे आयोजन

अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचा संयुक्त उपक्रम

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार २९ रोजी आणि बुधवार १ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरक्षेचा उपाय म्हणून रक्तदान करणार्यांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. आयत्यावेळी येणार्यांना रक्तदान करता येणार नाही. रक्तदात्यांना रक्तदान केंद्रावर ठरवून दिलेल्या वेळी घरून घेऊन येणे आणि घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या महामारीला सर्व पातळीवर तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असताना त्यांना सामाजिक शैक्षणिक संघटनाही सक्रिय सहकार्य करीत आहेत. या महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासणार असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबरनाथ नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार २९ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी तीन या वेळेत आणि बुधवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत रोटरी सभागृह, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सुरक्षेचा उपाय म्हणून रक्तदान करणार्यांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. आयत्यावेळी येणाऱ्यांना रक्तदान करता येणार नाही. रक्तदात्यांना रक्तदान केंद्रावर ठरवून दिलेल्या वेळी घरून घेऊन येणे आणि घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी रो. डॉ. सागर धडस 8928777700 आणि रो. मुकेश विसपुते 9867655009 यांचेशी संपर्क साधावा.
सध्याची आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक रेवणकर यांनी केले आहे.

 472 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.