त्या ९ पैकी ४ जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझीटीव्ह


ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ९

ठाणे : कोरोना व्हायरसचे शनिवारी आणखी चार रुग्ण आढळले असून कळवा, पारसिक नगर भागातील ज्या इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या समवेत ९ जणांना कस्तुरबाला हलविण्यात आले होते. त्यातील चार जणांना कोरोनाची बाधाचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरीत पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी त्यांन कस्तुरबा रुग्णालयात देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. घरातील इतर ९ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले आहे. तर आतार्पयत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतार्पयत ५५ जणांना पाठविण्यात आले असून त्यातील ३० जणांना सोडण्यात आले असून उर्वरीत २५ जण देखरेखाली आहेत. पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर कळवा पारसिक नगर भागातील ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ सदस्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयात पाठविले होते. त्यातील चार जणांचे रिपोर्ट आता पॉझीटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत पाच जणांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. परंतु त्यांनाही देखरेखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ९ झाली आहे.
दरम्यान आता र्पयत पालिकेच्या माध्यमातून २८ मार्च र्पयत १८८६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९५४ नागरीक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ९३२ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतार्पयत १८२९ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ५५ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या वलगीकरण कक्षात १० संशयीतांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.

 482 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.