डोंबिवलीत सुचना देऊनही अनेकजण मोर्निंग वॉकसाठी घराबाहेर


डोंबिवली: कोरोनाने भारतात थैमान घालण्यास सुरूवात केली असून दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी लागु केली आहे. मात्र संचारबंदीतही अनेकजण मॉर्नीगवॉसाठी सकाळी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. हा विषाणु सर्दी, खोकल्या पसरत असल्याने एक मीटरचे अतंर पाळा असे सांगण्यात येत असतानाही अनेकजण  बिंधास्त रस्त्याने फिरताना दिसत आहेत.
   मॉर्नींग वॉक करणे फायदेशीर असले तरी सद्यास्थितीत घरातच थांबा असे वारंवार राज्य आणि केंद्र सराकराकडून सांगण्यात येत आहे. मात्र रोज सकाळी अनेक जण आरोग्य जपण्याच्या उद्देशाने मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडत आहे. हे घराबेहर पडणे अनेकांना महागात पडू शकते.  विशेष म्हणजे एकमेकांना खेटून चालत असल्याचे देखील दिसून येत आहे. डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम येथे हे प्रकार अधिक पहावयास मिळत आहेत. इतकेच नव्हे तर एखाद्याा व्यक्तीला सर्दी खोकला झाला असला तरी तोंडाला रुमाल बांधा या पोलिसांच्या आवाहनाला देखील पुरेसा प्रतिसाद नाही. त्यामुळे पोलिस देखील हवालदिल झालेले दिसून येत आहेत. अनेक जणांनी रस्त्यावरील थुंकणे थांबवले नसल्याने कोरोनाची लागण वाढण्याची शक्यता अधिक आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व सोसायट्यांमध्ये माईकवरून बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. 

 434 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.