‘करोना’साथीमुळे उद््भवू शकणाºया संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुरबाड पंचायत समितीच्या वतीने गुरूवारी सकाळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरूवात झाली. पंचायत समितीच्या कार्यालयात गर्दी न करता अतिशय शिस्तीत पार हे शिबीर पार पडले. या शिबिरात एकुण १११ बाटल्या रक्त संकलीत झाल्याची माहिती संयोजकांनी दिली.

724 total views, 1 views today