भिवंडी आणि कल्याण तालुक्यांच्या सीमेवर असणाºया कोन, गोवा नाक्याजवळील वैदू समाजाच्या झोपडपट्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोन तालुका कार्यकारिणीने २१ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामध्ये तांदूळ ,डाळ, साखर, तेल आणि साबण या वस्तूंचा समावेश होता. सर्वत्र संचारबंदी असल्याने या समाजातील लोकांना सध्या कोणतेही काम नाही. हातावर पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले होते. संघाच्या पदाधिकाºयांनी घरोघरी जाऊन सामान वाटप केले. त्याचप्रमाणे या वस्तीतील मुलांच्या अभ्यासासाठी अभ्यासिका सुरू करण्याची तयारी दाखवली. यावेळी ‘करोना’विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही माहिती देण्यात आली.

679 total views, 2 views today