प्लॅस्टिक समस्या आणि उपाय शनिवारी ऑनलाईन कार्यशाळा

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस घरातच पडून रहावे लागत असल्याने कंटाळा आलेल्या मुलांसाठी आर निसर्ग फाऊंडेशनच्या वतीने ‘प्लास्टिक प्रदुषण समस्या आणि उपाय’ याविषयी सविस्तर माहिती देणारी एक ऑनलाईन कार्यशाळा शनिवार, २८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प्लॅस्टिक आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्याचा वापर टाळता येणे अशक्य असले तरी कमी वापर, पुर्नवापर तसेच पर्यायी साधनांचा वापर करून आपण त्याचे प्रमाण निश्चितच कमी करू शकतो. याविषयी कार्यशाळेत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९८६७१५३९३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ११ वर्षांवरील मुले-मुली या कार्यशाळेत सहभागी होऊशकतील.

 567 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.