तीन दिवस डोंबिवली – कल्याण शहरातील रिक्षा बंद

सहा संघटनांनी घेतला निर्णय

डोंबिवली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डोंबिवली – कल्याण शहरातील रिक्षा तीन दिवस बंद करण्यात आल्या आहेत. शुक्रावरी सायंकाळी ४ वाजता वाहतुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी ही कारवाई करण्यात आली असून डोंबिवलीतील सहा संघटनांनी रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणु वाहतुकीच्या माध्यामातून अधिक पसरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रिक्षेत बसणारे प्रवासी कोण कोठून आले आहेत याची कल्पना नसते.त्यामुळे शासनाने निर्णय दिल्याप्रमाणे रिक्षा बंद केल्याची माहिती वाहतुक शाखेचे कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी. बी. निघोट यांनी दिली. सर्व बसची सुविधा सुरू असल्याने नागरिकांनी शासकीय सुवधिांचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे. तर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय मांजरेकर, काळु कोमास्कर, संजय देसले यांनी कोरोना व्हायरस हे देशाचे संकट असल्याचे सांगत निरोगी आयुष्य जगणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सरकारच्या निर्णयाशी सहमत असून पुढील तीन दिवस म्हणजे रविवार २२ मार्च पर्यंत रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली शहरात सुमारे ११ हजार रिक्षा आहेत.

 549 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.