महिला सन्मान ही अभिनंदनीय गोष्ट आहे

प्रविणा देसाई यांचे प्रतिपादन

डोंबिवली : घर आणि समाज यांचा सुयोग्य मेळ राखण्याचे कार्य घरातील स्त्री करीत असते. त्या महिलांना घरातील सर्वांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. या पार्श्वभूमीवर आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला ही अभिनंदनीय आणि अनुकरणीय बाब आहे असे प्रतिपादन ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्राच्या खजिनदार प्रविणा देसाई यांनी केले.

 एकता नगर येथील एकता मित्र मंडळ येथे  आयोजित केलेल्या आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, अक्षरमुद्रा यु ट्यूब चॅनल, भारतीय डाक ठाणे विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्याने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका ज्योती मराठे तर प्रमुख पाहुणे ज्ञानदीप विद्या मंदिर मुंब्राच्या शिवानी देसाई (उपाध्यक्ष) व प्रविणा देसाई (खजिनदार), डोंबिवली पोस्ट मास्तर सुषमा ताम्हाणे, दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहसंपादक संदीप प्रधान  आणि कल्याण वैभवचे संपादक विश्वास ुलकर्णी उपस्थित होते. या प्रसंगी कल्याण वैभवच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी वरिष्ठ संपादक संदीप प्रधान, सहायक पोस्ट मास्तर सुषमा ताम्हाणे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योती मराठे यांनी अक्षरमुद्रा चॅनलवरील स्वयंसिद्धा मालिकेचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.डॉ.योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या,' स्वयंसिद्धा  या यूट्यूब मालिकेत नगरसेविका ज्योती मराठे, लता पाटील, नीता आरसुळे , वृषाली मुळ्ये, अश्विनी कुलकर्णी, स्वप्नगंधा करमरकर, कविता वैरागडे,लीला गाजरे, शमशाद बेगम मुल्ला, अजिता घोडगावकर, वैशाली कांदळगावकर, डॉ.नीता निकम, कांचन साळगावकर, अॅड. विद्या गोळे, अर्चना पाटील, ट्विंकल वीरा, राजश्री मेणकुदळे, सृष्टी कांबळे, अलका भुजबळ, हर्षदा कक्कर, स्नेहल सोपारकर, करिश्मा खर्डीकर, अंजली जोशी, सुजाता नेने, सुप्रिया कुलकर्णी, अर्चना वेलणकर, रिदीमा शिंदे,  साक्षी परब   या महिलांना स्वयंसिद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या मालिकेची निर्मिती सुनंदा जोशी, हेमंत नेहते, अॅड. सुधा जोशी यांची असून योगेश जोशी यांनी लेखन दिग्दर्शन व शलाका जयंत यांनी छायाचित्रण केले आहे. स्वयंसिद्धा मालिकेतील मान्यवरांच्या मुलाखती अॅड.आश्लेषा गुजराथी, आरती मुळे, हिमानी कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, मुग्धा घाटे, कल्याणी देवळेकर, प्रांजल हजारे, मानिनी महाजन, दिप्ती डेरे, स्नेहा वाघ, वृषाली शिंदे, गीता जोशी, अॅड अर्चना सबनीस, स्नेहा मुळे, अक्षता साळशिंगीकर, वैभवी तरटे, मीनाक्षी सरोदे, अर्पिता देशपांडे, शलाका जयंत , मनवा कुलकर्णी, धनश्री कांदळगावकर, गौरी रानडे,  डॉ. राणी खेडेकर ज्योती कपीले यांनी घेतल्या होत्या.

   भारतीय पोस्ट खाते ठाणे विभागाच्या संदीप जाधव यांनी सुकन्या योजनेची माहिती समजावून  सांगितली तसेच अमृता नारखेडे , रिटा विश्वकर्मा, विनिता गावकर, प्रीती शेटे , सुनीता म्हात्रे, आरोही सावंत , चेतना एलगर, संगीता हेमाडे, ज्योती कुडेकर , नम्रता चौधरी यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुकन्या योजनेची पासबुक वितरित करण्यात आली. तसेच ज्या महिला पालकांना फक्त  मुलगी आहे, अशा  ५० मातांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गेली ११ वर्षे आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था हा उपक्रम राबवित आहे. आज पर्यंत ५१६० महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान व समर्थ अॅडव्हटायझर च्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील वार्तासूत्र ( अर्पिता देशपांडे) , डॉकटर रुग्णमित्र ( संध्या एकनाथ जाधव), विश्व भ्रमंती ( डॉ सुनिल कवठे),कल्याण वैभव ( विश्वास कुलकर्णी ), वयम् ( श्रीकांत बापट), कृषिराज ( बाबूराव पाटील ) या दिवाळी अंकांना व मौनाची स्पंदने ( मानसी कुलकर्णी) या कविता संग्रहास अक्षर गंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीता नेहते, मुग्धा घाटे, आरती मुळे , भालचंद्र घाटे , अॅड यतीन गुजराथी, मच्छिंद्र कांबळे डॉ प्रकाश माळी, राजेश ढाके, प्रवीण झोपे, एल.जे.पाटील यांनी  या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत नेहेते तर सूत्रसंचालन योगेश जोशी आणि मानिनी महाजन यांनी केले.समर्थ नागरी सहकारी पतपेढी कल्याण  व खर्डीकर क्लासेस यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले होते.

 566 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.