डोंबिवलीत परदेशातून आलेल्या १९ नागरिकांना कोरोना नाही

घरातून बाहेर न पडण्याचे पोलिसांनी दिले निर्देश

डोंबिवली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.मात्र परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरीकाला कोरीनाची लागण झाल्याचा संशय घेत रहिवाशी अश्या नागरिकांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करत आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अहवाल आणि कोरोना नसल्याची खात्री पोलीस करत आहेत.डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील १४ नागरीक हे परदेशातून आले आहेत. मात्र रहिवाश्यांना हे परदेशातून आलेले नागरीकांबद्दल संशय आल्याने ते वैतागलेल्या स्थितीत आहेत.परंतु या १४ नागरिकांना कोरोना झाला नसल्याचा तपासणी अहवाल पोलिसांकडे आहे.या नागरिकांना १४ दिवस क्वाॅरटाईन मध्ये रहावे असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
परदेशातून डोंबिवलीत आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली असेल तर आपल्याही त्याची लागण होईन अशी भीती रहिवाश्यांना वाटत आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याची तपासणी झाली आहे कि नाही याची खात्री केली आहे असा प्रश्न रहिवाशी पोलीस आणी पालिका प्रशासनाला विचारीत आहेत.डोंबिवली पश्मिमेला विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ आणि पूर्वेकडील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ असे एकूण १९ नागरीक परदेशातून आले आहेत. या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी झाली असून तसा तपासणी अहवाल त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे नागरीक आपल्या घरी परतले असले तरी त्यांना कोरीनाची लागण झाला आहे का असा संशय रहिवाश्यांना वाटत आहे. हे नागरीक घराबाहेर पडत असल्याने रहिवाशी अधिकच घाबरले आहेत. याबाबत रहिवाशी पोलिसांना सांगत आहेत.पोलिसानी रहिवाश्यांची म्हणणे एकूण परदेशातून आलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली.

 537 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.