रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा देण्यासाठी निधीची टंचाई
डोंबिवली : मध्य रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्या २३ ट्रेन रद्द केल्याने आरक्षित तिकिटाचे पैसे घेण्यासाठी प्रवाश्यानी एकच गर्दी केली असून काल च्या दिवसात ६ लाख ५ हजार ८० रुपयांची तिकिटे काढण्यात आली मात्र आज तिकिटाचे पैसे घेण्यासाठी प्रवाश्यानी गर्दी केल्याने सुमारे ४ लाख ४०० रुपये परत करण्यात आले एकाच वेळी प्रवाश्यानी गर्दी केल्याने आरक्षण केंद्रावर निधीची टंचाई निर्माण झाली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी तिकिटे रद्द करण्यासाठी गर्दी केल्याने व प्रवाश्याचे तिकिटाचे सर्व पैसे परत करण्यात येत आहेत. केवळ आरक्षणाचे ६० रुपये कापले जात असल्याचे सांगण्यात आले. ३०० तिकिटाचे पैसे परत करण्यात आले असून सुट्टीसाठी बाहेरगावी जाणारे प्रवासी पण तिकिटे रद्द करत असल्याचे स्टेशन प्रबंधक अब्राहम यांनी सांगितले.सध्या सुट्टीतील तिकिटाचे आरक्षण करण्यापेक्षा तिकिटे रद्द करण्याची गर्दी होत आहे. इतर तिकीट खिडकीवरील पैसे घेऊन प्रवाश्यांना पैसे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकल गाडीसाठी गर्दी कमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना गरज असेल तर बाहेर पडा व घरून काम करा असे आवाहन केले. त्याला डोंबिवलीकरणी चांगला प्रतिसाद दिला. ऐन गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये प्रवास करणार्याची संख्या कमी झाली असून सुमारे ५० टक्के प्रवासी कमी झाल्याचे रेल्वे कर्मचारी सांगत आहेत. रेल्वे ट्रेन भरून जाणाऱ्या डोंबिवली स्थानकावर आज खूप कमी गर्दी दिसत होती. रस्त्यावर देखील वाहतूक कमी झाली असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालयात केवळ अत्यावश्यक असणाऱ्या नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे कार्यालयात बरीच गर्दी कमी दिसत होती दुकानदारांनी देखील ग्राहक नसल्याचे सांगून एरवी मोबाईल दुकानात गर्दी असते ती अजिबात दिसत नव्हती असे दुकानदार सांगत होते. एकूण डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्व उद्याने बंद करण्यात आली असून त्याचा परिणाम मॉर्निंग वॉकवर झाल्याचे दिसून आले. तसेच डोंबिवलीचे ग्रामदैवत गणेश मंदिर पण दर्शनासाठी पुढील सुचनेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
557 total views, 1 views today