कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील गरिबांच्या वस्त्यांंकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

स्वच्छता केवळ अभिजन समाजापुरतीच आहे का विचारला जातोय सवाल

डोंबिवली : नोवेल कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहर तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले असतानाही डोंबिवली शहरातील इंदीरा नगर, त्रिमुर्ती नगर येथे मात्र अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.या वस्त्यांंकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्षित केल्याचा आरोप भाजपचे डोंबिवली शहर सचिव राजू शेख यांनी केला आहे. नागरिकांना दुर्गंधी आणि आजुबाजुला पसरलेल्या घाणीचा सामना करावा लागत आहे.

नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दर शनिवारी डोंबिवली शहराची स्वच्छता करण्याचे ठरवले असले तरी ही स्वच्छता केवळ अभिजन समाजापुरतीच आहे का असा सवाल वस्त्यांमधून विचारण्यात येत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेतील व्यवहारही ठप्प झाल्याचे निदर्शनास येत असून भावनिक लढा दिला जात असून तांत्रिक लढ्याकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होत आहे. चीन देशानंतर जगभरात थैमान करणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. कधी कोणत्या देशातून मृत्युची बातमी ऐकू येत आहे तर कधी कोणत्या देशातून करोना रूग्णांची वाढती संख्या ऐकू येत आहे. त्यामुळे बऱ्याच देशात स्वच्छता राखा असा संदेश देण्यात येत असून सतत हात धुवा, एकाच ठिकाणी गर्दी करून उभे राहु नका, स्वच्छतागृह डेटॉलने स्वच्छ करा असा विविध सुचना देण्यात येत आहेत.असे असले तरी डोंबिवली शहरातील ७४ झोपडपट्ट्यांची अवस्था अंत्यत दयनीय आहे. या सर्वच परिसरात दुर्गंधी पसरली असून गटारातून काढलेला कचरा देखील त्याच गटारांच्या आजुबाजुला पडला आहे. या सर्व कारणांमुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नोवेल करोना सोबतच इतर साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिक संपूर्ण शहराला विविध पध्दतीने सेवा पुरवत असतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक आजारी पडल्यास शहरातील अनेक सेवा बंद होऊ शकतात. तसे झाल्यास जबाबदार कोण असा थेट सवाल या वस्तींमधून विचारण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या वस्तींमधून अनेकजण आजारी पडले असून त्यांना मलेरीया सारख्या रोगाचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे दर शनिवारी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी स्वच्छ डोंबिवलीची मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या कर्मचाºयांसह स्वत: आयुक्त या मोहीमेसाठी उपलब्ध असतात. मात्र असे असले तरी केवळ फडके रोड, आणि डोंबिवली शहरातील अभिजन वसाहतीमध्येच ही स्वच्छता होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. विशेष म्हणजे यात डोंबिवलीतील पश्चिमेकडे देखील अद्यापही ते फिरकले नाहीत. त्यामुळे आयुक्त देखील भेदभाव करत आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर कोरोनोाच्या पाश्र्वभूमीवर तरी या वस्त्या स्वच्छ होतील अशी आशा वस्तीतील रहिवाशी व्यक्त करताना दिसत आहेत.

 579 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.