कोरोना ग्रामीण भागात फैलावण्याची शक्यता कमी

इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

डोंबिवली : कोरोना या जीवघेण्या विषाणूमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे सरकार तर्फे लोकांमध्ये जनागागृती केली जात आहे. तर याच विषयी डोंबिवलीतील इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे पोस्टर, सोशलमिडिया आणि इतर माध्यमातून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. विशिष्ट प्रकारची माहिती नागरिकांना मिळावी या हेतूने हॉस्पिटल आणि क्लिनिक मधून ही पोस्टर लावण्यात येणार असल्याची माहिती डोंबिवली आयएमएच्या अध्यक्ष डॉ. मीना पृथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ.वंदना धाकतोडे, डॉ. भक्ती लोटे आदी उपस्थित होते. गावाकडील जनजीवन सुरक्षित आहे तर तेथील लोक प्रवास कमी करतात, गर्दी टाळतात. त्यामुळे हा विषाणू ग्रामीण भागात फैलावण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आयएमएच्या अध्यक्ष डॉ. मीना पृथी यांनी यावेळी दिली.
डॉ. पृथी म्हणाल्या, आयएमएची डोंबिवलीत जवळपास ४०० सदस्य आहेत. कोरोन विषाणू हा हवा आणि वस्तूंच्या मार्फत पसरतो. जवळपास ३ मीटर अंतर असलेल्या पृष्ठभागावर त्याचे वास्तव्य असते. या विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून मासचा वापर करावा. गर्दीचे ठिकाण टाळावे. प्रवास कमी करून हा रोग पसरू नय म्हणून जेवणा आधी व जेवणानंतर हात स्वच्छ धुवावे. सर्दी खोकला असलेल्यानी मास वापरणे गरजेचे आहे. सॅनिटायझरचा वापर दिवसातून किमान दोन ते तीन वेळा करावा. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार वर्क फॉर्म होम करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. आयएमए चे गावं खेड्यामध्ये कोरोना विषयक जनजागृती काय या प्रश्नावर माहिती देतांना डॉ. पृथी म्हणाल्या गावाकडील जनजीवन सुरक्षित आहे तर तेथील लोक प्रवास कमी करतात, गर्दी टाळतात. त्यामुळे हा विषाणू ग्रामीण भागात फैलावण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. आयएमएची स्वतंत्र वेबसाईट आणि +९ 1 ९९९९६७२२३८ , +९१ ९९९९६७२२३९ अशी हेल्प लाईन सुरु केली आहे. केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे अनुकरण आयएमएचे सर्व सदस्य करीत आहेत. पोस्टरद्वारे समाजमाध्यमातून जनजाग्रुती करण्यात येत आहे असेही डॉ. पृथी यांनी सांगितले.

 650 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.