नागरिकांना दिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला
डोंबिवली : कोरिनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनतेला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना आता पोलीसही जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसते.वरिष्ठांच्या आदेशानुसार डोंबिवली रामनगर पोलिसांनी इंदिरा चौकात जनजागृती केली.कायदा आणि सुरक्षाची जबाबदारी सांभाळत ही जनजागृती करताना नागरिकांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले.तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो.नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळा अश्या प्रकारची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सुरेश आहेर, पोलीस निरीक्षक( गुन्हे ) नारायण जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, गोपनीय खात्याचे कर्मचारी सुनील खैरनार, रंगनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
815 total views, 1 views today