नगरपालिका नकोय, त्यांना पाहिजे महापालिका

२७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

डोंबिवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका न करता १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचे जाहीर केले.यात ९ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतचा राहणार असल्याने यावर सर्व पक्षीय संघर्ष समितीने शिवसेनेवर जोरदार टीका केली.२७ गावांची नगरपालिका महानगरपालिका घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे समितीने बैठकीत सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद बाबतच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर भूमिका मांडण्यासाठी सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीची तातडीची बैठक पार पडली. यावेळी आमदार प्रमोद (राजू) पाटील, समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, डॉ.वंडार पाटील, विजय भाने, गजानन मांगुळकर, सुदाम गावकर, दत्ता वझे, दीपक ठाकूर, सुरेश जोशी, बळीराम तरे यांच्यासह इतर पदाधिकारी व २७ गावातील काही ग्रामस्थांनी मंदिर खचाखच भरून गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपली मते व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांचा हा अत्यंत चुकीचा निर्णय दिला आहे. आमच्या १८ गावांना बाहेर काढून ९ गावांना डांबून ठेवल्यासारखा हे झालं आहे. भूमिपुत्रांना भाजपा आणि विकास आधाडीने सरकारने फसविले आहे. यावेळी वाटलं होत कि, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमच्या बाजूने निर्णय देतील पण तस झालं नाही. २७ गावांत फुट पाडण्यात आली आहे. पण आता आगरी समाजाला एकत्रच राहील पाहिजे. समाज टिकवायचा असेल तर सर्वांनी समिती बरोबर राहिलं पाहिजे. तर गुलाब वझे म्हणाले, आमचा संघर्ष चालूच राहील.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही प्रथम पासून संघर्ष समितीची मागणी आहे. आमची नाराजी, आमचं म्हणण आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत आणि तरीही २७ गावांची नगरपालिका झाली नाही तर आमची भूमीला पुढे ठरवू. यावेळी राजू पाटील म्हणाले कि, २७ गावांचीच नगरपालिका हवी आहे. जी गावं काढली आहेत त्यांना महसुली उत्पन्न मिळाले पाहिजे. जी गावे पालिकेत ठेवली आहेत त्यांत एमआयडीसी विभाग आणि निवासी भाग गेला आहे त्यामुळे १८ गावांची होणारी नगरपरिषद सक्षम होणार नाही. येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही गोष्ट मांडणार आहोत. आमचं ६७ टक्के काम केलं आहे त्यामुळे त्याचे आभारही मानतो पण असं अर्धवट काम चालणार नाही

 488 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.