न्यायालयात चोरीचा प्रयत्न

खिडकीचे ग्रील वाकवून फाईल्सची उलथापालथ करत चोरीचा प्रयत्न

डोंबिवली : कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यानी एकच धुमाकूळ घातला असून आता न्यायालयाला देखील चोरट्यांनी लक्ष केले .कल्याण न्यायालयातील खिडकीचे ग्रील वाकवून फाईल्सची उलथापालथ करत चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने चोरट्याने काही चोरले नसून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत आहेत .
कल्याण पश्चिम थील कल्याण न्यायालयात गेल्या शनिवार रविवार असलेल्या सुट्टीचा फायदा घेण्याचा चोरट्याने प्रयत्न केला. १३ तारखेला सायंकाळी साडे सहा ते सोमवारी सकाळी साडे दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने न्यायालयाच्या चेंबरची खिडकीचे गज काढून आत प्रवेश करत फाईल्स ची उलथापालथ करत काही तरी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्याच्या हाती काही लागले नाही.काल सकाळी ही बाब निदर्शनास आल्याने या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

धूम स्टाईलने तिघांचे मोबाईल लंपास

कल्याण पश्चिम चिकन घर छोटा म्हसोबा मैदान संजीवनी अपार्टमेंट मध्ये राहणारे सुधाकर ससाने काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीचा सिकंदर परिसरातून पायी चालत जात असताना समोरून भरधाव वेगाने दुचाकी आली दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने त्यांच्या पत्नीच्या हातातील मोबाईल हिसकावून क्षणार्धात धूम ठोकली . याप्रकरणी ससाने यांनी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .दुसरी घटना मुरबाड रोड परिसरात घडली .म्हारळ येथे राहणारे बलदेव सिंग मुरबाड रोड हुन कल्याण स्टेशन रोड वरून पायी चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली .दुचाकी वर तिघे जण बसले होते यामधील एक इसमाने बलदेव याला पकडून दोघांनी मोबाईल हिंसकावला व क्षणार्धात धूम ठोकली .या प्रकरणी बलदेव यांनी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .तिसरी घटना कल्याण पूर्व लोकग्राम परिसरात घडली आहे .कल्याण पूर्व पुष्पगीरी अपार्टमेट मध्ये राहणारे श्रीनिवास ताटेवाड १३ मार्च रोजी लोकग्राम परिसरातून पायी चालत जात असताना मागुन दुचाकीवर दोन इसम आले त्यांनीं श्रीनिवास यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला .या प्रकरणी त्यानि कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .

धक्का लागल्याच्या वादातून चाकूने हल्ला

कल्याण पूर्व आनंदवाडी येथे राहणारे मोहमद हासमी काल सकाळी सव्वा आठ वाजन्याच्या सुमारास या परिसरात असलेल्या शौचलयात प्रातः विधी उरकून घराच्या दिशेने जात असताना याच परिसरात राहणाऱ्या अल्लाउद्दीन नावाच्या इसमाला धक्का लागला .त्यामुळे संतापलेल्या अल्लाउद्दिनने चाकूने मोहमद यांच्यावर हल्ला करत पाठीवर तोंडावर वार केले .या हल्ल्यात मोहमद याना गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अल्लाउद्दीन नावाच्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

तीन गाड्यांच्या काचा फोडून कारटेप चोरी

कल्याण पश्चिम खडकपाडा हिना गार्डन शेजारील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तीन गाड्यांच्या काचा फोडून अज्ञात चोरट्याने कारटेप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी
कल्याण पश्चिम खडकपाडा वसंत व्हॅली सोसायटी मध्ये राहणाऱ्या हिना पारेख २४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने जात असताना समोरून येणार्‍या कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत घेणा-यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी काल खडक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

डोंबिवलीत घरफोडी

डोंबिवली पश्चिम कर्वे रोड विठ्ठल स्मृती सदन मध्ये राहणाऱ्या राजश्री एंचिलवार काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेला अज्ञात चोरट्याने ही संधी साधत त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून एकूण तीन हजारांचा मुद्देमाल लंपास केला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

 578 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.