आपुलकी प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

संस्थेचा वर्धापन दिन अनाथ मुलांसोबत साजरा केला

डोंबिवली : आपुलकी प्रतिष्ठान डोंबिवली या संस्थेचा प्रथम वर्धापनदिन ठाण्यातील शारदा विद्यामंदिर या अनाथ मुलांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळीयावेळी अभियंता गंगाजल पाटील, सुमेधा थत्ते, दिपाली कोळेकर आणि वृषाली शिंदे या महिलांचा आपुली प्रतिष्ठानच्यावतीने ‘महिला रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
आपुलकी प्रतिष्ठान डोंबिवली यांचा प्रथम वर्धापनदिन ठाण्यातील शारदा विद्यामंदिर या अनाथ मुलांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच अनाथ मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आणि मुलांना खाऊचे वाटपसुध्दा उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, स्मित वृध्दाश्रमाच्या योजना घरत, सामाजिक संस्थेच्या आरती नेमाने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन अक्षता औटी हिने केले व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सतीश चोणकर, राजेंद्र गोसावी, सतीश गोलतकर, वैष्णवी नाईक यांनी विशेष मेहनत घेतली व संस्थेचे अध्यक्ष विलास चव्हाण यांनी सगळ्यांचे आभार मानले.

 655 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.