ठाणेशहर पोलीसांकडून इ चलानचे नियम धाब्यावर

* ई-चलान कारवाई करताना ठाणे पोलिसांचा खाजगी मोबाईलच। वापर चुकीचा 


ठाणे : हेल्मेट सक्तीच्या वाहतूक नियमाने दुचाकीस्वार भलतेच हैराण झाले असताना रस्त्याच्या कडेला लपून बसलेले ठाणे पोलीस या नियमाचा गैरवापर करताना दिसतात. शासनाच्या परिपत्रकानुसार  नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वार अथवा वाहन चालकाला दंडात्मक कारवाई करताना, फोटो काढण्यासाठी खासगी मोबाईलचा वापर करायचा नाही. असा आदेश आहे, मात्र या आदेशाचा भंग ठाणेशहर पोलीस करत आहेत. दुचाकीस्वारावर  कारवाई करताना पोलीस त्यांच्या खासगी मोबाईलमधून फोटो काढून ते ई-चलान मशीनवर अपलोड करताना सर्रास दिसून येतात. परंतु चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाई बाबत ठाणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
ठाणे शहर पोलीस गुन्हेगारांना शोधण्यापेक्षा विनाहेल्मेट घालणाऱ्या दुचाकीस्वारांच्या पाठीमागे लागले आहेत. कुठेतरी दबा धरून कोणी हेल्मेट परिधान केल नसेल, तर त्याचा छुप्या पद्धतीने खाजगी मोबाईल मधून फोटो काढला जातो आहे.  तसे करणे शासन परिपत्रक क्रमांक जा.क्र. अपोमसं (वा)/४४/वाचक/ई-चलान/७४३/२०२० अन्वये पोलिसांना मनाई करण्यात आली आहे. मात्र अशी मनाई असतानाही पोलीस सर्रासपणे दोषी वाहनचालकांचे फोटो खाजगी मोबाईलमध्ये काढत आहेत. त्या फोटोंचा दुरूपयोग होऊ शकतो अशी भीती नागरिक व्यक्त करतात.


* कोपरित नगरसेवकाने दिले पत्र
डॉक्टर, शाळा, महाविद्यालय बाजारहाट अथवा किरणामाल समान आणण्यासाठी अनेक कोपरिकर दुचाकीवर जातात. जवळच जायच असल्यामुळे काहीवेळा हेल्मेट घालून जात नाही. याच गोष्टीचा फायदा उठवत कोपरी पोलीस स्वतःच्या खाजगी मोबाईल मधून फोटो काढताना दिसतात. कोपरी पोलिसांच्या या वागणुकी बाबत नागरिकांनी नगरसेवक भरत चव्हाण यांना साकडं घातलं असून, चोकचौकात उभे न रहाता महत्वाच्या पॉइंटवर उभे राहून हेल्मेटची कारवाई करावी असे विनंतीपत्र भरत चव्हाण यांनी वाहतूक शाखा आणि कोपरी पोलिसांना  दिलं आहे.

* परिपत्रकात काय आहे
 . असे  निदर्शनास आले आहे की, काही  पोलीस अधिकारी अंमलदार हे दोषी वाहनाचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतःच्या खासगी मोबाईलवर सदर वाहनांचा फोटो काढून नंतर तो ई-चलान मशीनवर अपलोड करून त्याद्वारे ई-चलान बनविले जात आहेत.
 पोलीस अधिकारी अंमलदार यांना सदरबाबत सूचित करून दोषी वाहनाचालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःचे खासगी मोबाईलचा वापर न करता ई-चलान माशीनद्वारेच सर्व कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी घ्यावी.

* इचलान मशीन मधून फोटो काढा 
वाहनचालक अथवा विना हेल्मेट दुचाकीस्वरावर कारवाई करण्यासाठी  वाहतूक पोलिसांना ई-चलान मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामार्फतच कारवाई करावी  नौपाडा, ठाणेनगर, राबोडी आणि कळवा पोलिसांना ई-चलान कारवाईसाठी एकेक ई-चलान मशीन देण्यात आली आहे. खाजगी मोबाईल मधून फोटो काढू नये असे ही सर्व पोलीस ठाण्यांना सांगितलं आहे.
– अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

 930 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.