कॅरम स्पर्धा पुढे ढकलल्या

मुंबई : कोरोनावायरस ( कोविड १९ ) मुळे संपूर्ण देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत व राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने आपल्या सर्व राज्य स्तरीय स्पर्धा स्थगित केल्या आहेत. देशातील व राज्यातील स्थिती आटोक्यात आल्याची खात्री व राज्य शासनाची अनुमती प्राप्त झाल्यानंतरच आपल्या स्पर्धा सुरु करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. शिवाय राज्य कॅरम असोसिएशनने आपल्या सर्व संलग्न जिल्हा संघटनांनीही आपल्या  स्पर्धा स्थगित कराव्यात असे कळविले आहे. राज्य संघटनेच्या या निर्णयामुळे एप्रिल महिन्यात होणारी मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा व मुलुंड जिमखाना आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.  १५ एप्रिल नंतर एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धा आयोजनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच अखिल भारतीय कॅरम महासंघानेही २५ ते २८ मार्च दरम्यान नागपूर येथे होणारी जुनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, तसेच ३१ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान वाराणसी येथे होणारी सब – जुनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा व २६ वी अखिल भारतीय फेडरेशन चषक कॅरम स्पर्धा अनिश्चित काळाकरिता पुढे ढकलली आहे. 

 712 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.