सरकारच्या आदेशामुळे एक लाख कामगार बेरोजगार

कामगारांच्या धरणे आंदोलनात कामा संघटनाही सहभागी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथे असणाऱ्या एमआयडीसी परिसरातील प्रदुषण वाढवणाऱ्या आणि अतिधोकादायक असणाऱ्या २१ कारखाने बंद करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. मात्र या कंपनीतील सुमारे पाच ते सहा हजार कामगांरावर बेकारीची कुऱ्हाड आली असून यामुळे त्यांची कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर २१ कंपन्या बंद झाल्याने बाकीच्या कारखानदार मालकांनी आणि कामा संघटनेने ४७५ कारखाने बंद केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे १ लाख कामगार बेरोजगार होणार आहे.सरकारच्या या निर्ण्याविरोधात शुक्रवारी सोनारपाडा येथील टेम्पो नाका येथे कामगारांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात कामा संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

फेब्रुवारीमहिन्यात मॅट्रोपॉलिटिन  या कंपनीला आग लागली होती. दुर्देवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गुलाबी रस्ता, आगी लागणे, सांडपाणी, प्रदुषण या कारणास्तव कारखानादारांवर ताशेरे ओढले जात होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एमआयडीसी परिसराची पहाणी करून आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या. अतिधोकादायक, कमी धोकादायक असे वर्गिकरण करण्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अतिधोकादायक म्हणून पाच कंपन्यांची नावे जाहीर केली होती. यामध्ये मॅट्रोपॉलिटिन कंपनीचा समावेश होता. त्यानंतर जवळपास २१ कंपन्या विविध कारणाने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार देशोधडीला लागले असून त्यांची कुंटुंबे देखील वाऱ्यावर आली आहेत. एमआयडीसी तयार करण्यासाठी ज्या भूमीपुत्रांकडून जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनी परत करा अशी मागणी ते करत असून आमच्या जमिनी कारखानदारांसाठी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे कामातर्फे जवळपास ४७५ कारखान्यातील कामगारांनी धरणे आंदोलन केले असून कारखानदारांनी तर कोणत्याही सुविधा न देता टॅक्स घेणाऱ्या महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडिसी, औद्योगिक सुरक्षा विभाग  आणि सरकारी विभागांना दोषी ठरवले असून बफर झोन तोडून बांधकाम करण्यासाठी परवानगी देणारे सर्वच अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिक दोषी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर हे धरणे आंदोलन बेमुदत असून शांततेत करणार असल्याची माहिती कारखानदारांनी दिली. या धरणे आंदोलनाला जवळपास ३० ते ३५ हजार कामगार जमा झाले आहेत. इतकेच नव्हे तर सर्व नियम पाळण्यास तयार असून अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यास बांधील असून एकही संधी न देता त्यांनी कारखाने बंदच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे जवळपास एक लाखाच्यावर कामगार बेकार होणार आहेत. यासाठी हे धरणे आंदोलन केल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांना चांगले दिवस यावे आणि एमआयडीसीची जागा त्यांच्या ताब्यात जावी यासाठी हा डाव खेळला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

 577 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.