पालिका आयुक्त डॉ.सूर्यवंशी कारवाई करणार का ?
सामाजिक कार्यकर्त्याचा उपोषणाचा इशारा
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर पालिकेने १३ नोव्हेंबर २०१९ रोजी दिखाव्यांची कारवाई केली होती.मात्र काही दिवसातच पालिकेचा हा दिखावा जनतेच्या समोर आला. पाच महिने उलटूनही या अनधिक बांधकामावर पालिका कारवाई करत नसल्याने यात काही गौडबंगाल आहे का असा प्रश्न डोंबिवलीकर विचारत आहेत. नवनियुक्त पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करतील का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र नांदोस्कर यांनी या बांधकामावर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.
पालिकेच्या नाकावर टिच्चून काही विकासकांनी पाच महिन्यापूर्वी डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरु केले.सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका कार्लेकर यांनी या अनधिकृत इमारतीवर कारवाई होण्यासाठी पालिकेकडे तक्रार केली होती. या अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारीवर पालिकेने १३ नोव्हेंबर २०१९ रोजी पोलीस बंदोबस्तात इमारतीच्या चार –पाच भिंतीवर हातोडा मारला.त्यानंतर या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून अनेक हात पुढे आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नगरसेवकाने सुरुवातीला या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिकेकडे तक्रारी केल्या. काही दिवसांनी नगरसेवकाने याकडे का कानाडोळा केल्याबद्दल याचे जनतेला आश्चर्य वाटत आहे.पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या इमातीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने विकासकांची हिम्मत वाढली.बांधकामावर हिरवा कपडा टाकून पाण्याच्या पाईपलाईन. ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले.या इमातीत काही घरात लोक राहण्यास आली असून अद्याप हिरवा कपडा असल्याने जनतेला अंधारात ठेवत असल्याच्या भ्रमात या इमारतीचे विकासक आहेत.या इमारतीच्यावर कारवाई होण्यासाठी एकही राजकीय पक्ष महासभेत का आवाज उठवीत नाही याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून कोणत्या राजकीय पक्षातील नेतेमंडळी आपली ताकद लावत आहे याचे उत्तर जनतेला हवे आहे. नवनियुक्त पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पुन्हा समाजसेवक राजेंद्र नांदोस्कर हे लेखी तक्रार करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र नांदोस्कर यांनी या बांधकामावर कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.
पालिका उपायुक्त,अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांची माहिती द्यावी असे आवाहन केले होते. परंतु डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरु असूनही उपायुक्त लक्ष्मण पाटील आणि पालिका अधिकारी यांनी का पाठ दाखवली ? या बांधकामाला कोणाचा आश्रय आहे ? यांची उत्तरे पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना जनतेला द्यावी लागणार आहे.
आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
नवनियुक्त पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून केली. मात्र अनधिकृत बांधकामाबाबत पालिका आयुक्त का आक्रमक होत नाही याचे सर्वाना आश्चर्य वाटत आहे.डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे भागृहाजवळील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरु असताना पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी या इमारतीवर कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.
600 total views, 1 views today