करोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यासाठी जनहित याचिका

जोंधळे एज्युकेशन ग्रुपतर्फे शाळा, सरकारी कार्यालये बंद ठेवण्याची याचिकेत मागणी

डोंबिवली : जगभर करोना वायरस हात पाय पसरू लागला आहे.हा धोका बघता शाळा व लघु न्यायालय व सरकारी कार्यालयाना पुढील सूचना मिळे पर्यत व परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत सुट्टी जाहीर करावी अशी एका जनहित याचिका मुबई उच्च न्यालायात दाखल करण्यात आली आहे. जोंधळे एज्युकेशन ग्रुप तर्फे ही याचिका सागर जोंधळे यांनी दाखल केली .या बरोबरच धार्मिक स्थळावर नागरिकांनी जाण्याचे टाळावे अशी सूचना करण्याची मागणी देखील या याचिकेत केली गेली आहे.

जोंधळे एज्यूकेशन ग्रुपचे सागर जोंधळे यांनी दाखल केलेल्या या याचिकेत ब्रिटिश कालीन केलेल्या एपीडेमिक अँट १८९७ हवाला देण्यात आला आहे. या बरोबरच हा कायदा जुना झाला असून यात सुधारणा करण्याचे करण्यात यावी अशी मागणी देखील या मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.देशात या करोना व्हायरसमुळे चिंताजन परिस्थिती निर्माण झाल्याचे पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आल्याने यावर मुंबई उच्च न्यालायलय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यालायलायातील मुख्य न्यायाधीशांनाकडे करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की,जसा आपत्ती कायदा आहे.त्या प्रमाणेच एखाद्या महामारीचे व्यवस्थापन करणारा कायदा आहे पण तो आता जुना झाला आहे. सद्या ब्रिटिशकालीन एपीडेमिक अँट १८९७ कायदा लागू आहे. पण यात त्रुटी असून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.देशभरात करोना व्हायरस पसरत आहे. या मुळे शाळा , लघु न्यायालये व सरकारी कार्यालये यांना पुढील सूचना मिळे पर्यत सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात धार्मिक स्थळावर गर्दी करत एकत्र येऊ नये सूचना करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे.

 515 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.