बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांसाठी पोलीस ठरले देवदूत

मांडवानजीक बोटीतील ८८ प्रवाशांना बुडण्यापासून पोलीसांनी वाचवले

अलिबाग : मांडवा बंदरात आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अजंठा प्रवासी बोट बुडाली. या बोटीमधून ८८ प्रवासी प्रवास करत होते. पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या बोटीने ८० जणांना वाचवले. अन्य ८ जणांना खासगी बोटीने वाचवले .
गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून सकाळी ९ वाजता निघालेली हि बोट मांडावा बंदरा जवळ २०० मीटर अंतरावर असताना बुडू लागली. त्यावेळी घाबरलेल्या प्रवाशासाठी पोलिसांची सद्गुरू कृपा बोट आणि त्यावरील पोलीस अधिकारी देवदूत ठरले. मांडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी १०. १५ वाजण्याच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान ८८ प्रवाशांना घेऊन जाणारी अजिंठा प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून १ किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागली. त्यावेळी बोटीतुन प्रवास करणाऱ्या पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला. त्यादरम्यान असता सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटी वरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत (पो. ना बक्कल न. ८९१) यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांच्या मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त सावधगिरीने त्यावरील ८८ पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवत त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप आणले. सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसुन सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी व पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक केले आहे.

 484 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.