महिला दिनी जेष्ठ महिलांचा सन्मान

ठाणे :जागतिक महिला दिनानिमित्त धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे यांच्या वतीने जेष्ठ महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

जेष्ठत्व म्हणजे श्रेष्ठत्व ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुख मार्गावर अनेक पदे सांभाळलेली. प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक क्षेत्राचे अद्यावत ज्ञान मिळालेली असतात. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा योग्य फायदा समाजाच्या विकासांत व्हावा या हेतूने धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे व धनगर प्रतिष्ठान,ठाणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त धनगर समाजातील ६० वर्षावरील जेष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेेळी उपमहापौर पल्लवी कदम,धनगर समाज विकास परिषद प्रदेश अध्यक्षा निहारिका खोंदले,माजी नगरसेविका विशाखा खताळ, परिवहन समिती सदस्य पूजा वाघ,स्नेहा खांडेकर,डॉ अरुण गावडे,महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर,धनगर प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक कुरकुंडे आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासासाठी काम करत असून समाजातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असतात, महिला दिनानिमित्त जेष्ठ महिलांचा सन्मान करून आपण जेष्ठत्वाचा मान राखलात याबद्दल उपमहापौर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.निहारिका खोंदले यांनी आपल्या भाषणात जेष्ठ नागरिकांनी आपल्याला कधीही जेष्ठ मानू नये कारण जेष्ठत्व जरी आयुष्याची संध्याकाळ असली तरी आपण घर,संसार बाजूला ठेऊन या जेष्ठत्वाचा मनमुराद आनंद घ्यावा,कारण आयुष्यभर आपण आपल्या कुटुंबासाठी झिजला पण वयाच्या उतार वयात आपण आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगा असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ सचिव गायत्री गुंड,खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार संगीता खटावकर,सदस्य सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सुजिता कुचेकर,सल्लागार अर्चना वारे,मीना कवितके,रेश्मा लबडे,स्नेहलता खांडेकर,धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड,उपसचिव तुषार धायगुडे,सल्लागार सुनील राहिंज,उत्तम यमगर आदीसह महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

 784 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.