शिवजयंती

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री अनिल परब जी, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष सूर्यकांत महाडिक उपस्थित होते.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा विमानतळाच्या मध्यस्थळी बसविण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

 550 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.