डोंबिवलीत बसथांब्यावर दारुडे आणि गर्दुल्यांचा ताबा

परिवहन व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांचा कानाडोळा

डोंबिवली : करदात्या नागरीकांना योग्य सोयी-सुविधा मिळाव्या म्हणून पालिका प्रशासनाचे काम असून त्याकरता निधी उपलब्ध केला जातो. मात्र ज्या कामासाठी जनतेच्या पैशांचा वापर केला जातो प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा त्याचा फायदा होत नाही. परिवहन व्यवस्थापनाच्या बसथांब्याची अशीच अवस्था झाली आहे.डोंबिवली पश्चिमेला स्टेशन पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील बसथांब्याचा दारुडे आणि गर्दुल्यांनी ताबा घेतला आहे. बसथांब्यावर दारू पीत असतानाचा व्व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. बसथांब्यासमोर बस थांबवणे देखील मुश्कील झाले असल्याचे बसचालक आणि वाहक हे बसथाब्यांपासून लांब बस उभी करतात.या परिस्थितीकडे परिवहन व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांनि कानाडोळा केल्याचे दिसते.

शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी हे परिवहन समितीचे सभापती असताना त्यांच्या मंजुरीने डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेर बसथांबा बनविण्यात आला होता.मात्र आता या बसथांब्यावर दारुडे आणि गर्दुल्ले दिवसरात्र बसतात.एका भिकाऱ्याने तर चक्क बसथांब्यावर आपले घर बनवले असून त्यात राहतो. मध्यंतरी परिवहन व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित कामकाजामुळे डोंबिवली पश्चिमेला परिवहन बस धावत नव्हत्या. आता डोंबिवली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मोहित भोईर यांनी परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांच्याकडे पत्रव्यवहात आणि पाठपुरावा केल्यावर डोंबिवली पश्चिमेला एक मिनी बस सुरु झाली.परिवहन व्यवस्थापणाने लक्ष दिले नसल्याने बसथांब्याची दुरावस्था झाली आहे.डोंबिवली पश्चिमेकडे स्टेशनबाहेर बस उभी केल्यास दारुडे आणि गर्दुल्ले प्रवाश्यांना त्रास देतील म्हणून बसचालक आणि वाहक बसथांब्यापासून लांब बस उभी करतात.या परिस्थितीचा व्हिडीओ समाजसेविका प्रियांका कार्लेकर यांनी काढला. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

गर्दुल्यांकडून नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता

विष्णूनगर पोलीसांनी स्टेशनबाहेरील प्रवाश्यांची आणि नागरिकांच्या सुरक्षततेसाठी या बसथांब्याचा ताबा घेतलेल्या गर्दुल्ले हाकलून देत दारूड्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गर्दुल्ले नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकरता येत नसून भविष्यात असे घडल्यास याला विष्णूनगर पोलीस जबाबदार राहतील असेहि नागरिकांचे म्हणणे आहे.

 897 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.