डोंबिवली पोलीसांनी आयोजित केली होती महिलांसाठी कबड्डी स्पर्धा
डोंबिवली : ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत कल्याण परिमंडळ -३ मधील डोंबिवली पोलिस ठाण्याच्यावतीने डोंबिवली कार्यक्षेत्रात महिला जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने डोंबिवलीच्या नेहरू मैदानात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डोंबिवलीतील स्वस्तिक क्रिडा मंडळाने कल्याणच्या ज्ञानशक्ती क्रिडा मंडळावर विजय मिळवला. सदर स्पर्धेत सहा महिला संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील महिला विजयी आणि उपविजेत्या स्पर्धकांचा चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश आहेर, नगरसेवक मंदार हळबे, शिवसेनेच्या संघटक कविता गावंड, डोंबिवलीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
765 total views, 1 views today