वृद्धेचे दागिने लंपास

दागिने चमकवण्याचे आमिष

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे आधारवाडीच्या संभाजीनगर परिसरात व्यंकटेश कृपा इमारतीमध्ये राहणारी ७० वर्षीय महिला शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घरात एकटी होती. ही संधी साधत अनोळखी इसमाने त्यांचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच या इसमाने तांब्या-पितळेची भांडी घासण्याची पावडर विक्री करण्यास आल्याचे सांगत बोलण्यात गुंतवून या महिलेच्या घरातील एक तांब्याचे भांडे व पितळी देवाची मूर्ती घासून दिली. त्यानंतर सोन्याचे दागिने चमकवण्याची देखील पावडर असल्याचे आमिष दाखवले. या महिलेकडून तिच्या हातातील बांगड्या मागितल्या व बोलण्यात गुंतवुन या बांगड्या घेऊन हा इसम पसार झाला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच या महिलेने खडकपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला जखमी

डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौकात असलेल्या हिमालय ज्योती इमारतीमध्ये राहणाऱ्या शोभा शेट्टी या महिला 4 मार्च रोजी रात्री आठ वाजता सम्राट हॉटेल येथून रस्ता ओलांडत होत्या. इतक्यात एका भरधाव दुचाकीने शोभा यांना जोरदार धडक देऊन दुचाकीस्वार पसार झाला. या अपघातात शोभा शेट्टी यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी शेट्टी यांनी शनिवारी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

 636 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.