पंजा लड़ाना तेरे बस की बात नहीं…


गणेश नाईक यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर


ऐरोलीत नागरी सुविधांचा शुभारंभ


नवी मुंबई : शहराचा विकास केल्यामुळेच नवी मुंबईकरांनी मागील पंचवीस वर्षे  महापालिकेत माझ्या नेतृत्वाखाली सत्ता कायम ठेवली आहे पुढील पाच वर्षे देखील जनता निश्चित संधी देईल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.
माजी आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीमधून ऐरोलीतील प्रभाग क्रमांक २१ मध्ये सूफी संत पीर सय्यद बादशहा मिया उद्यानात आणि प्रभाग क्रमांक १८  मधील आणखी एका उद्यानात गजेबो  तसेच प्रभाग क्रमांक १८ येथील श्रीमती जानकीबाई मढवी मंगल कार्यालयात ध्वनी व्यवस्था सुविधा कामांचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार संदीप नाईक महापौर जयवंत सुतार ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार नगरसेवि का शशिकला सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील एडवोकेट संध्या सावंत कैलास सुकाळे पुनम सुकाळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. मागील पंचवीस वर्षे नागरिकांवर मालमत्ता आणि पाणी करवाढीचा बोजा टाकला नाही पुढील पाच वर्षे देखील नागरिकांना कोणतीही करवाढ सहन करावी लागणार नाही. अशी ग्वाही नाईक यांनी दिली. महापालिका  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक नाईक यांना पोकळ आव्हान देऊ लागले आहेत.
त्यांचा खरपूस समाचार घेताना नाईक यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील  अभिनेते नाना पाटेकर यांच्या विक्रम चहा या जाहिरातीचा दाखला देऊन पंजा लड़ाना तुम्हारे बस की बात नहीं अपने बाप को भेज, और नाम पूछा तो बोल गणेश नाईक…. असा जबरदस्त टोला हाणला आहे. नवी मुंबईचा गतिमान विकास साधला आहे. शर्यतीमध्ये विरोधक आमच्या आसपासही नाहीत त्यामुळे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही असे सांगून जे विरोधक नवी मुंबईच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभे करतात त्यांनी आपापल्या शहरात विकासाबाबत काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात झालेल्या टीकेचे सडेतोड उत्तर देताना हाथी चलता है अपनी चाल… असं म्हणत नाईक यांनी टीकाकारांना त्यांची जागा दाखवली. माझ्यावर अजून पर्यंत एकही साधा अदखलपात्र गुन्हा दाखल नाही. आणि विरोधक खंडणी घेतल्याचा आरोप करीत आहेत.

 595 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.