डोंबिवलीत भाजपच्यावतीने कर्जमुक्ती आधार नोंद पावतीचे वाटप

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्ज मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आली पावती

डोबिवली : महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या वतीने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्ज मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण नोंद पावतीचे वाटप डोंबिवलीतील भाजपच्या ई गव्हर्मेंट सेवा केंद्राच्या वतीने वाटप करण्यात येत आहे.

 २०१४ ते २०१९ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली.महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जाची रक्कम योजेने अंतर्गत मंजूर करण्यात आली होती.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते, सिंचन आदी शेतीच्या कामांसाठी या योजनेतून कर्ज घेतले होते.आता आलेल्या महाआघाडीच्या सरकारने या कर्जाची रक्कम दीड लाखावरून दोन लाखापर्यत केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी युती सरकारच्या काळात कर्जमुक्तीसाठी अर्ज केले होते, त्यांना आता दिलासा मिळाला असून त्यांच्या कर्जाची परतफेड झाल्याचे बँकेतून ई गव्हर्मेंट सेवा केंद्राला कळविण्यात आली आहे.या केंद्राद्वारे कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधून आधार प्रामाणिकरण नोंद पावती मिळत आहेत.भाजप डोंबिवली ग्रामीण महिला अध्यक्षा सुहासिनी राणे यांच्या डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी येथील कार्यालयात ई गव्हर्मेंट सेवा केंद्र असून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क केल्यास त्यांना आधार प्रामाणिकरण नोंद पावती देण्यात येत आहे. याबाबत सुहासिनी राणे म्हणाल्या,भाजप-मित्र पक्षांनी बळीराजाला कर्जापासून मुक्तता दिल्याबद्दल शेतकरी सुखावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, युतीचे सर्व माजी मंत्री आणि मित्र पक्षातील मंत्री यांना याचे श्रेय जाते. 

मधुकर ढमाले यांनी मानले आभार
पुणे येथील मुळशी तालुक्यातील शेतकरी मधुकर धमाले यांना डोंबिवलीतील भाजपच्या आधार प्रामाणिकरण नोंद पावती मिळाली आहे.गावात बोअरवेल लावण्यासाठी धमाले यांनी सदर योजनेतून कर्ज घेतले होते. भाजप-शिवसेना मित्र पक्षांमुळे आज शेतकरी कर्जमुक्त झाल्याने याबाबत त्यांनी आभार मानले.

 524 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.