स्टारफिशची जलतरणपटू आयुषी आखाडेची हॅट्रिक

संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी जलतरण

ठाणे : गेट ऑफ इंडिया येथे नुकत्याच झालेल्या संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया या १ कि.मीच्या सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस् फाऊंडेशनची आयुषी कैलास आखाडे हिने यंदा हॅट्रीक करीत फास्टेस्ट स्वीमरचा किताब प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकाविला. सलग तीन वर्षे या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह फास्टेस्ट स्वीमर किताब पटकाविणाऱ्या आयुषी आखाडे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्पर्धेत स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचे १५ जलतरणपटूंन सहभाग घेतला होता. यात ‍१ कि.मी स्पर्धेत रियान नरोटे याने ७ वा, रुद्र निसार याने १० वा क्रमांक प्राप्त केला. २ कि.मी स्पर्धेत नील वैद्य याने ३ रा, सोहम साळुंखे याने ५ वा, श्री लोखंडे याने ८ वा, कुणाल शिंदे व तनिष शिटकर यांनी ९ वा. क्रमांक प्राप्त केला. तर ५ कि.मी स्पर्धेत गार्गी शिटकर हिने २ रा, ईशा शिंदे हिने ३ रा तर मानव मोरे याने १० वा क्रमांक पटकाविला. तसेच या स्पर्धेत ‍चिरायु चौलकर याने ५ किमी ,२ किमी ‍सिध्दांत पोळ, वरद कोळी, अर्णव गोसावी आदींनी १ किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले.

नवीमुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धा

नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटू यांनी विशेष कामगिरी करीत पदके पटकाविली. १२ वर्षाखालील गटात बॅकस्ट्रोक या प्रकारात ईदांत चतुर्वेदी याने सुवर्णपदक प्राप्त केले. तर १० वर्षाखालील गटात बॅकस्ट्रोक या प्रकारात ‍ विहान चतुर्वेदी याने सुवर्णपदक, फ्री स्टाईल प्रकारात रौप्यपदक, तर १०० मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. तर ‍ आदित्य घाग याने ५० मीटरच्या व १०० मीटर या दोन्ही स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. तर परीन पाटील याने ५० मीटरच्या बटरफ्लाय या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. आठ वर्षाखालील गटात विराट ठक्कर याने बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्णपदक तर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले.

 654 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.