२३ वी मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धा
मुंबई : शारदा मंगल कार्यालय, दादर येथे संपन्न झालेल्या २३ व्या मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत झालेल्या अंतिम लढतीत एअर इंडियाच्या झैद अहमदने बाजीने मारली. त्याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेच्या नवोदित भरत कोळीचा २५-०, २०-१५ व २५-१ असा पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या मिताली पिंपळेने रिझर्व्ह बँकेच्या अनुभवी संगीता चांदोरकरवर १९-१२, १२-२५ व २५-१८ असा निसटता विजय मिळवत महापौर चषकावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत मजल मारण्यापूर्वी झैदने त्याच्याच सहकारी संदीप दिवेला २३-२४, २३-८ व २५-१ असे हरविले होते. तर दुसरीकडे भरत कोळीने माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेचा ६-२५, २५-१९ व २५-२१ असा पराभव केला.
स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या हस्ते विजेत्यांना महापौर चषक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक पाटील, संदीप सावला, मानद सरचिटणीस यतिन ठाकूर, खजिनदार अरुण केदार व आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत उपस्थित होते.
764 total views, 1 views today