चौकीसाठी जनहित प्रतिष्ठानने केला होता पाठपुरावा
डोंबिवली : चार –पाच वर्षापासून बंद असलेली डोंबिवली पश्चिमेकडील गणेश नगर येथील वाहतूक शाखा मंगळवार ३ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु झाली आहे.जनहित प्रतिष्ठानचेचे अध्यक्ष महेश काळेआणि जितेंद्र अमोणकर यांनी हि वाहतूक शाखा सुरु होण्यासाठी वाहतूक शाखेच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून वारंवार पाठपुरावा केला होता.डोंबिवली पश्चिमेला वाहतूक शाखेची आवश्यकता आहे. कोपर पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने सर्व वाहने ठाकुर्ली येथील स.वा. जोशी शाळेजवळील उड्डाणपुलावरून जात-येत असतात. ही शाखा उड्डाणपुलाजवळ असल्याने वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण होईल असे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे.
612 total views, 1 views today