महिला दिनानिमीत्त डोंबिवली सोशल फाउंडेशनने केले आयोजन
डोंबिवली : जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवार ७ मार्च रोजी ब्राम्हण सभा सभागृहात दुपारी ४.३० वाजता उद्योग मंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात व्यवसायाच मार्केटिंग आणि ब्रॅडींग या विषयावर तन्ही हर्बल्सच्या संचालिका डॉ. मेधा मेहंदळे,उद्योगासाठी कौशल्यविकास आणि समस्येच संधीत रुपांतर या विषयावर उज्ज्वला हावरे, उद्योगासाठी गुंतवणूक कशी करावी ? या विषयावर एनएसडीएलचे उपाध्यक्ष मनोज साठे आणि उद्योग कसा वाढवावा आणि उद्योगासाठी कर्ज कस मिळवाव या विषयावर महिला विंग एमसीसीआईच्या अध्यक्षा प्रज्ञा पोंक्षे मार्गदर्शन करणार आहेत.भाजप नगरसेविका खुशबू चौधरी हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. या कार्यक्रमाच्या मध्य्मानातून अनेक उद्योजकांना एकत्र घेऊन एक चळवळ सूर व्हावी, एकमेकांच्या सहाय्याने व्यवसायात वृद्धी व्हावी हा उद्देश आहे.हा कार्यक्रम विनामुल्य आहे
608 total views, 3 views today