मिताली -संगीता अंतिम लढत

२३ वी मुुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धा

मुंबई : शारदा मंगल कार्यालय, दादर पूर्व येथे सुरु असलेल्या २३ व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत जैन इरिगेशनच्या मिताली पिंपळेने तिच्याच सहकारी निलम घोडकेवर अटीतटीच्या लढतीत २४-८, १३-२५ व २५-१६ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. तर दुसरीकडे अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या अनुभवी संगीता चांदोरकरने एस एस ग्रुपच्या मैत्रेयी गोगटे विरुद्ध तीन सेटपर्यंत रंगलेल्या कडव्या लढतीत २५-४, १९-२५ व २५-१५ असा विजय मिळविला.


 पुरुष गटातील उपउपांत्य लढतीचे निकाल

झैद अहमद ( जैन इरिगेशन ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) २५-४, २५-१०संदीप दिवे ( एअर इंडिया ) वि वि गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) २५-९, २५-६भरत कोळी ( मुंबई महानगरपालिका ) वि वि पंकज पवार ( जैन इरिगेशन ) ९-२५, २५-१७ व २५-२०योगेश धोंगडे ( जैन इरिगेशन ) वि वि राहुल सोळंकी ( एस. एस. ग्रुप ) ११-२५, २५-५ व २५-७

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.