विद्या चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा


भाजपा महिला मोर्चा ठाणे शहर जिल्हा यांची मागणी


ठाणे : सुनेवर केलेल्या अत्याचाराप्रकरणी ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा साै.हर्षलाताई बुबेरा यांच्या नेतृत्वामध्ये आमदार विद्या चव्हाण यांचा निषेध करण्यात आला.
सुनेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनत प्रदेशाध्यक्ष ऍड माधवी नाईक यांनी मागणी केली.
आ. विद्या चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्हाची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.
महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दिखावा करणा-या विद्या चव्हाण यांचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेला आहे. सुनेने गुन्हा दाखल केल्यानंतर सुने विरोधातच चारित्र्यहनन करणारे आक्षेपार्ह विधान करणेही निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करावी.सत्तेचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी संबंधित तपास यंत्रणांनी घेतली पाहिजे. चव्हाण यांच्या वर्तनामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या पिडीत सुनेच्या पाठिशी असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा हर्षला बुबेरा, सरचिटणीस ऍड .तृप्ती जोशी पाटील, सरचिटणीस नयना भोईर, उपाध्यक्षा .प्राची नाईक, विद्या कदम,चिटणीस सुवर्णा अवसरे तसेच महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या.

 448 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.