ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांना ७ व्या वेतन आयोगाचा टॅब अखेर सुरू

भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्याला यश

ठाणे : ७ व्या वेतन आयोगाचा टॅब सुरू न केल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ७ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी पासून वंचित होते अखेर भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या सेवार्थ ने टॅब सुरू केला असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.
याबाबत भाजपा शिक्षक आघाडी कोकण-मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी संबंधित खात्याच्या सचिवांची २३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्यासमोर ही तांत्रिक अडचण मांडली होती. त्यानंतर सेवार्थकडे पाठपुरावा केला होता.
राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोग सुरू झाला आहे. त्याप्रमाणे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांसाठी ७ वा वेतन आयोग लागू झाला असूनही यासाठी स्वतंत्र सेवार्थ प्रणाली विकसित करण्याचे काम शासनाच्या महा आयटी महामंडळाकडे देण्यात आले आहे. राज्यातील इतर विभागात याबाबत कार्यवाही झाली आहे परंतु ठाणे जिल्ह्यासाठी टॅब सुरू न केल्यामुळे ७ व्या वेतन आयोगप्रमाणे शिक्षकांना लाभ मिळत नव्हते. भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी पाठपुरावा करून अखेर सेवार्थ चे टॅब सुरू केले.

 429 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.