राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा करणार होते निषेध
डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने येथील डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. रामनगर पोलिसांकडून निदर्शनास परवानगी देण्यात आली होती. सकाळी काही कार्यकर्ते इंदिरा चौकात जमा पण झाले. पण अचानक ही निदर्शने न करता कार्यकर्ते निघून गेले.वरिष्ठांनी निदर्शन करण्यास मनाई केल्याने आयत्या वेळी निदर्शने केली नाही असे भाजप पदाधिकाऱ्या सांगितले.परंतु भाजपने निदर्शने न केल्याने याबाबत डोंबिवलीकरांमध्ये चर्चा सुरु होती. यापूर्वी भाजपने केलेली आंदोलने, मोर्चे आयत्या वेळी मागे घेण्याची हि पहिलीच वेळ होती.त्यामुळे निदर्शने जाहीर करताना भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणे केले नव्हते का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
570 total views, 3 views today