राजीव गांधींच्या पुतळ्यासाठी काँग्रेसतर्फे समन्वय समिती

ठाणे महानगर पालीकेत झाला आहे ठराव मंजूर

ठाणे : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गाधी यांच्या पुतळ्यासाठी समन्वय साधन्याकरिता शहर काँग्रेसने एक कृती समिती बनवली असून यामध्ये माजी गटनेते संजय घाडीगावकर,जेष्ठ नेते राम भोसले,सचिन शिंदे,सुखदेव घोलप,जे.बी.यादव,महेंद्र म्हात्रे,राहुल पिंगळे,व नाना कदम याचा समावेश आहे.
दिवंगत राजीव गांधी यांच्या पुतळा उभारण्याकरिता ठाणे महानगरपालिका सभागृहात ठराव होउन अनेक वर्षे याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे शहर काँग्रेसच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.या आदोलनादरम्यान राज्याचे वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय मंत्री व ठाणे जिल्हा संपर्क मंत्री असलम शेख यांनी भेट दिली. याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के यांच्या सह विरोधी पक्षनेते प्रमिला किणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला,स्थायी समिती सभापती राम रेपाळे याच्या सह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी राज्याचे मंत्री असलम शेख यांनी पुतळ्यासदर्भात झालेल्या दिरगाई बाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उपस्थित सर्व पक्षीय नेते व अधिकारी यांनी त्वरित कारवाई करून पुतळा लवकरात लवकर उभारण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
शहर काँग्रेसने नेमलेल्या समितीने याबाबतचा पाठपुरावा करून स्वर्गीय राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्याकरिता आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न करेल असे शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी सांगितले.

 447 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.