११ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत

ठाणेसह, पालघर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे निकालात काढणार

ठाणे : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा सत्र न्यायालय , ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये , कौटुंबिक न्यायालये , कामगार न्यायालये , सहकार न्यायालये, व इतर न्यायालयांमध्ये आर .एम जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे , यांच्या मार्गदर्शनाखाली ११ एप्रिल रोजी सकाळी १० : ३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे .
राष्ट्रीय लोक अदालतीचे दिवाणी स्वरूपाची , फौजदारी स्वरूपाची , वैवाहिक स्वरूपाची , १३८ एन. आय. ऍक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणे ,कौटुंबिक वाद प्रकरणे , कामगार विषयक वाद , भूसंपादन प्रकरणे , वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा .
तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा . तसेच राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल व कोणतीही चौकशी करायची असल्यास वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे – ०२२-२७५८००८२, भिवंडी – ०२५२२-२५०८२८, कल्याण -०२५१-२२०५७७०, मुरबाड – ०२५२४-२२२४३३, शहापूर – ०२५२७- २०७०७७६, उहासनगर – ०२५१-२५६०३८८, पालघर- ०२५२५-२५६७५४, वसई -०२५०- २३२५४८५,वाडा-०२५२६-२७२६७२, डहाणू -०२५२८-२२२१६० ,जव्हार ०२५२०-२२२५६५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे , येथे येऊन प्रत्यक्ष संपर्क किंवा फोन नंबर ०२२-२५४७६४४१ द्वारे संपर्क साधावा .सर्व प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव एम . आर देशपांडे यांनी केले आहे

 398 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.