कल्याण पत्रिपुलाबाबत शिवसेनेची पुन्हा नवी डेडलाईन

आता मे महिन्याच्या अखेरचा मुहूर्त?

कल्याण : कल्याण पत्रिपुलच्या कामात होणाऱ्या दिरंगाईबाबत भाजपच्या आंदोलननंतर शिवसेना महापौर विनीता राणे व सभागृह नेता प्रकाश पेणकर यांनी पत्रकार परिषद घेतली .या पत्रकार परिषदेत महापौर राणे यांच्यासह पेणकर यांनी जेव्हा आमदार होतात तेव्हा पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय पाठपुरावा केला असा सवाल भाजपला करत काम अंतिम टप्प्यात असल्याने श्रेय घेण्यासाठी ही भाजपची नौटंकी असल्याचा आरोप केला . तसेच पत्रिपुल वाहतुकीसाठी मे अखेर पर्यंत खुला होईल असे सांगितले
कल्याणच्या पत्रिपुलाचे फेब्रुवारीची डेडलाईन ही उलटून गेल्याने भाजपने पत्रिपुलाच्या दिरंगाईबाबत आंदोलन करत निषेध व्यक्त केल्यानंतर महापौर विनिता राणे व सभागृह नेता प्रकाश पेणकर यांनी पत्रकार परिषद घेतली वेळोवेळी पत्रिपुलच्या कामाची पाहणी करत पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर आणि आम्ही स्वतः पाठपुरवा केला .खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः हैदराबाद येथे जाऊन पत्रिपुलाच्या गर्डरच्या कामाची पाहणी केली .पुलाच्या कामात तांत्रिक अडचणी आहेत त्या समस्या सोडवून काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .याआधी भाजपचे कल्याण पूर्व कल्याण पश्चिम असा दोन्ही ठिकाणी आमदार होते त्यानि का पाठपुरवा केला नाही ,पत्रिपुल भिवंडी लोकसभा मतदारसंघात असून खासदार कपिल पाटील यांनी किती वेळा पाहणी केली असा सवाल केला . मात्र हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून मे अखेर पर्यंत पत्रिपुल वाहतुकीसाठी खुला होईल असे सभागृह नेता प्रकाश पेणकर यांनी सांगितले.

 426 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.