अलका मुतालिक यांना मुकुंदाचार्य पुरस्कार

डोंबिवली : संत एकनाथ महाराज संशोधन मंदिर,संभाजीनगर या संस्थेमार्फत दर वर्षी उत्तम आध्यत्मिक ग्रंथ पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी हा पुरस्कार जेष्ठ प्रवचनकार व शिबीर विभाग प्रमुख अलका मुतालिक यांना जाहीर झाला आहे.मुकुंदाचार्य निलंगेकर यांच्या नावे मुकुंदाचार्य पुरस्कार असे नाव असून १८ मार्च रोजी डॉ उदय कुमठेकर नांदेड यांच्या आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते व उपस्तिथीत देण्यात येणार आहे.अलका मुतालीक यांच्या श्रीमत भागवत बोधकथामृत या ग्रंथास हा पुरस्कार लाभला आहे.अलका मुतालिक ह्या डोंबिवली गणेश मंदिराच्या उपाध्यक्षा आहेत तर श्री समर्थ सेवा मंडळ डोंबिवलीच्या त्या अध्यक्षा व श्री समर्थ विद्यापीठ साताऱ्याच्या त्या प्रमुख सल्लगार आहेत. आणि डोंबिवलीतील अनेक संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.