संदीप देवरुखकर तिसऱ्या फेरीत दाखल

२३ वी मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा


  मुुंबई : शारदा मंगल कार्यालय, दादर पूर्व येथे सुरु असलेल्या २३ व्या मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या दुुुसऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने बी ई एस टी च्या अंकुश गायकवाडला १७-२५ असा पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये २५-१३, २५-० अशी मात करून ३ री फेरी गाठली. तर महिला एकेरीत  एस. एस. ग्रुपच्या मैत्रेयी गोगटेने बँक ऑफ इंडियाच्या अनुपमा केदारला २५-१५, २५-५ असे नामवित तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

  पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे 
गिरीधर राजुला ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि सम्राट मोहिते ( म का क मंडळ, ना म जोशी मार्ग ) ११-२५, २५-१२, २५-८विवेक भारती ( एस एस ग्रुप ) वि वि सुशांत वैराट ( अंकुर स्पोर्ट्स क्लब ) २५-१०, २५-१४रीतिकेष वाल्मिकी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि इम्रान नाईक ( माझगाव डॉक ) २५-१३, २५-१७शशांक नाईक ( म का क मंडळ, नायगाव ) वि वि सौरभ मते ( एस एस ग्रुप ) ७-२५, २५-१०, २५-१३शशिकांत घाडगे ( पोस्ट ऑफिस ) वि वि देव कासरंग ( ए के एफ ) २०-२५, २५-१४, २५-९सलमान खान ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि संजय बर्वे ( बी ई एस टी ) २५-४, २५-१५

  महिला एकेरी दुसऱ्या फेरीचे निकाल 
निलम घोडके ( जैन इरिगेशन ) वि वि समृद्धी चव्हाण ( म का क मंडळ, नायगाव ) २५-४, २५-०उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) वि वि वैशाली पापाबतानी (  म का क मंडळ, ना म जोशी मार्ग )  २५-५, २५-१अंजली सिरीपुरम ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) वि वि समिधा जाधव (  म का क मंडळ, नायगाव )  ६-२५, २५-७, २५-१

 514 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.