आता डोंबिवलीतही होणार कॅन्सरवर उपचार

महिला दिनाचे औचित्य साधून होणार अद्यावयत कॅन्सर केअर आणि डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात

डोंबिवली : आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांमध्ये कॅन्सर रोगाबाबत भिती दूर व्हावी, व्यापक प्रमाणात जागरुकता निर्माण व्हावी आणि निदान व उपचार माफक दरात उपलब्ध व्हावेत याकरिता सह्रदय चँरिटेबल फाउडेंशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. फाउडेंशनच्या वतीने कॅन्सर केअर आणि डायगोनोस्टिक सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तलाप कार्यक्रम अंतर्गत फाउडेंशन च्या पदाधिकारी यांनी याबाबत माहिती दिली.
सह्रदय चँरिटेबल फाउडेंशन अध्यक्ष पाँल पँरापिल्ली, उपाध्यक्ष ओमेन डेव्हिड, सचिव पी एन सुरेश, प्रेमलाल आर, संजीवनी हाँस्पिटलचे अरुण पाटील, यावेळी उपस्थित होते. फाउडेंशनच्या वतीने कॅन्सरवरील निदान आणि उपचार आणि समुपदेशनसाठी डोंबिवलीतील गांधी नगर येथे सेंटर उभारण्यात आले आहे. येत्या ८ मार्च जागतिक महिला दिनी या सेंटरचे उदघाटन जागतिक मल्याळी परिषदेचे ( वर्ल्ड मल्याळी कौन्सिल ) मुंबई विभागाचे अध्यक्ष के. के. नंबियार यांच्या हस्ते होणार आहे.केरळ राज्याचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.डोंबिवलीतील गांधी नगर येथील आनंद दिघे सभागृहात उदघाटन सोहळा पार पडणार आहे. सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होईल.टिटवाळा येथे अद्ययावत सुसज्ज कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी नियोजित स्थळ मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अध्यक्ष पाँल पँरापिल्ली आणि उपाध्यक्ष ओमेन डेव्हिड यांनी दिली.

 474 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.