संदीप स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत बक्षिसांची लयलूट

ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील कळवा येथील मनीषा विद्यालय येथे आयोजनात करण्यात आलेल्या संदीप स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहा वर्षांपासून ते बारा वर्षांपर्यंतच्या युवक युवतींनी सहभाग घेऊन स्पर्धत घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत आंतर राष्ट्रीय साहसी खेळाडू अमोल कदम, राष्ट्रीय खेळाडू अर्चना ओवळेकर, सुखदीप कौर, सुषमा यादव, कोमल ढवळे, स्नेहा पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.युवक, युवतींना कला गुणांना वाव मिळावा, याकरिता कळवा विभागात जिम्नॅस्टिक प्रशिक्षक संदीप पाटील यांनी मागील कित्येक वर्षांपासून सुरू केलेली संदीप स्पोर्ट्स ही संस्था जिम्नॅस्टिक खेळाच्या माध्यमातून खेळाडू घडवण्याचे मोठे कार्य करत आहे. यामुळे जिम्नॅस्टिक स्पर्धेकरिता मनीषा नगर येथील मनीषा विद्यालयात जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहा वर्षे वयोगटपासून बारा वर्षे वयोगटाच्या युवक, युवतींनी सहभाग घेऊन पारितोषिक पटकाविले. यामुळे विजेत्या खेळाडूंना आंतर राष्ट्रीय साहसी खेळाडू अमोल कदम, राष्ट्रीय खेळाडू अर्चना ओवळेकर, सुखदीप कौर, सुषमा यादव, कोमल ढवळे, स्नेहा पुरोहित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संदीप स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक संस्था ही खऱ्या अर्थाने जिम्नॅस्टिक खेळाडूंना जिल्हा, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे खेळाडू सहभाग घेऊन यश संपादन करून आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे तसेच देशाचे नाव रोशन करेल अशा प्रकारे या संस्थेत प्रशिक्षण देऊन खेळाडू घडवायचे उत्कृष्ट काम संदीप स्पोर्टस ही संस्था करत असून पालकांनी जिम्नॅस्टिक खेळामधील आपल्या मुलाना प्रशिक्षकांनी शिकवलेले प्रशिक्षणाचा सराव घेणे आवश्यक असून आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक असल्याचे आंतराष्ट्रीय साहसी खेळाडू अमोल कदम यांनी या प्रसंगी उपस्थित खेळाडू आणि पालकांना सांगितले.
जिम्नॅस्टिक स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संदीप स्पोर्टसचे जिम्नॅस्टिक संस्थेचे प्रशिक्षक संदीप पाटील, विनायक पाटील, विद्यानंद लोहार, विनोद लोहार, अभि लोहार, संजय जगताप, आशुतोष पाटील यांनी विशेष मेहनत घेतली

स्पर्धेचा निकाल

सहा वर्षाखालील मुले- प्रथम-नीरज बुंदे, द्वितीय-पार्थिक वर्मा, तृतीय- अद्वैत पवार,

सहा वर्षाखालील मुली-प्रथम- हृदया वरे, द्वितीय- सोम्याश्री अचार्य, तृतीय- पौरवी पेडणेकर


आठ वर्षाखालील मुले– प्रथम- अथर्व पेणकर, द्वितीय- शार्दुल बांदिवडेकर, तृतीय ओम कंद

आठ वर्षाखालील मुली- प्रथम-सखाना रेडियर, द्वितीय- उन्नती भदाने

दहा वर्षाखालील मुली- प्रथम- वैदही राहुल, द्वितीय- तनिष्का सडेकर, तृतीय- कीर्ती पांचाळ

दहा वर्षाखालील मुले – प्रथम- वंश रावल, द्वितीय- अनिकेत वर्मा, तृतीय ध्रुवन शिंदे

बारा वर्षाखालील आणि १४ वर्षाखालील मुले-
प्रथम- आदित्य चौधरी, द्वितीय-देवराज माने, तृतीय- पियुष डांगे

बारा आणि १४ वर्षाखालील मुली-
प्रथम- रिद्धी कोचरेकर, द्वितीय- स्वामिनी पेडणेकर, तृतीय- सेजल गुप्ता

 710 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.