आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात जिल्हातुन १ लाख २७ हजार १५६ विद्यार्थी देणार परीक्षा

ठाणे : माध्यामिक शाळांत परीक्षा (१० वी) च्या परिक्षा आज मंगळवार ३ मार्च पासून सुरु होत आहे. या परिक्षेस ठाणे जिल्ह्यातून १ लाख २७ हजार १५६ विद्यार्थी दहावीची परिक्षा देणार आहेत. या परिक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली असून जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
रज्याभरात माध्यामिक शाळांत परिक्षा (१० वी) च्या परिक्षा मंगळवार ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. या परिक्षेसाठी ठाणे जिल्ह्यात १ लाख २७ हजार १५६ विद्यार्थी दहावीची परिक्षा देणार आहेत. यासाठी ३३० परिक्षा केंद्रे सज्ज करण्यात आली आहे. या परिक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी केंद्रावर मोबाईलला पुर्ण बंदी, वाय-फाय बंदी आणि परिसरातील झेरॉक्सची दुकाने पूर्ण बंद ठेवण्याचे आदेशही सर्व संबंधीत यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच या परिक्षा सुरळीत पार पडव्यात यासाठी सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना सर्व संबंधित आधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, परिक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परिक्षेच्या काळात कोणतीही अडचण येवू नये, याकरीता जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच परिक्षेच्या काळात वीज पुरवठा खंडीत होवून त्याचा परिणाम परिक्षा केंद्राती विद्यार्थ्यांना होवू नये याकरीता विजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सुचना महावितरण विभागाला देण्यात आल्या आहेत.

 473 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.