कोकण विभाग ठाणे राज्य उत्पादन पथकाची धडक कारवाई ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर व डोंबिवली पुर्व भागातील भोपर अशा दोन विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत कोकण विभागीय राज्य उत्पादन विभाग ठाणे यांच्यावतीने अवैध्य मद्याचा साठा जप्त करण्यात आला. यावेळी ४ जणांना अटक करण्यात आली असून ११ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग राज्य उत्पादन विभागाचे निरक्षिक आनंदा कांबळे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात अवैध, बनावट आणि परराज्यातील ममद्याविरुध्द कारावाईबाबात राज्य उत्पादन शुल्क आयुक्त के.बी.उमप, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन कोकण विभाग सुनिल चव्हाण, संचालक अंलबजावणी व दक्षता उषा शर्मा यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुक्‍ल, विभागीय भरारी पथक, कोकण विभाग यांनी कल्याण तालुक्यातील डोंबिवली पुर्व येथील भोपर गाव व उल्हासनगर ३ धोबीघाट, म्हारळगाव या परिसारात अवैध मद्य विक्रि संदर्भात पाळत ठेवली असता, डोंबिवली पुर्व येथील भोपर गावातील गोडावून मध्ये सुमित नायर आणि कुमार बाबना भंडारी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध मद्याचे ८० बॉक्स आढळून आले. तर, उल्हासनगर येथे अवैध मद्या वाहतूकीवर छापा मारला असता, संतोष बिरारे व निलेश शिंदे या दोघांना मद्यवाहतूकीसाठी वापरलेल्या रिक्षासह बनावट विदेशी मद्याचे ९ बॉक्स वाहतूक करतांना आढळून आले या दोन्ही कारावाईत ११ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग राज्य उत्पादन विभागाचे निरक्षिक आनंदा कांबळे यांनी दिली. या कारवाईत दु.निरीक्षक अनिल राठोड, आनंत पाटील, राजेंद्र शिर्के आदी सहभागी होते.

 628 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.